Friday , 14 December 2018
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Search in posts
Search in pages

72 हजार मेगा भरती Update..

Mega Bharti Maharashtra 72 Thousand updates..

10 Dec 2018: मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने स्थगिती ठेवलेली मेगा भरती सुरु करण्यासाठी प्रत्यक्ष पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारी सेवेतील 12 विविध संवर्गातील 302 जागा भरण्यास सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPPSC) प्रस्ताव पाठविला असून त्याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेगा भरतीच्या पहिल्या टप्यात 34 हजार जागा भरण्याचं विचार असून त्या कोण्या असाव्यात हे ठरविण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात आली आहे. या जागा फेब्रुवारी 2019 पर्यंत भरण्याचे प्रयत्न आहेत.

Notification..
05 Dec 2018 : राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 72 हजार पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांनी मंगळवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होणार असून पुढच्या आठवड्यात जाहिराती निघणार आहेत.

प्रत्येक विभागनिहाय भरती होणार असून प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील सुमारे 72 हजार पदांच्या भरती कार्यवाहीचा मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आढावा घेतला. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

कोणत्या खात्यात किती जागा?

  • आरोग्य खातं –  10 हजार 568 पदं
  • गृह खातं – 7 हजार 111 पदं
  • ग्रामविकास खातं – 11 हजार पदं
  • कृषी खातं – 2500 पदं
  • सार्वजनिक बांधकाम खातं – 8 हजार 337 पदं
  • नगरविकास खातं – 1500 पदं
  • जलसंपदा खातं – 8227 पदं
  • जलसंधारण खातं – 2 हजार 423 पदं
  • पशुसंवर्धन खातं – 1 हजार 47 पदं
  • मत्स्य खातं – 90 पदं

01st Dec 2018 : मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर सरकारी मेगाभरतीच मार्ग सुकर झाला आहे. राज्यातील 72 हजार पदांची भरती तात्काळ सुरु करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

After the approval of the Maratha reservation, the way to the government’s Megabharti is started. Chief Minister Devendra Fadnavis said in the Legislative Assembly on Friday that recruitment of 72 thousand posts in the state would commence immediately.

News source : Lokmat News 

Download pdf

72 हजार मेगा भरती Update..
3.9 (77.65%) 17 votes

Related Jobs


तुमचे वय मोजा !